एमएसआरटीसीच्या पुणे विभागात ४० नवीन 'लालपरी' बसेसचा समावेश   

मुंबई मार्गांवर एसी सेवा पुन्हा सुरू होणार

पुणे : लालपरीच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या ताफ्यात ४० नवीन 'लालपरी' बसेसचा समावेश करण्यात आला आहे. या बसेस बारामती, इंदापूर, शिवाजीनगर आणि स्वारगेट डेपोंना देण्यात आल्या आहेत. नवीन बसेसच्या समावेशामुळे पुणे-मुंबई मार्गावर गेल्या वर्षी बंद करण्यात आलेली सेवा आता पुन्हा सुरु होण्याची चाहूल लागली आहे. 
 
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कालबाह्य झालेल्या अनेक शिवनेरी आणि शिवशाही एसी बसेस रद्द करण्याचे आदेश दिल्याने पुण्यातील बारामती आणि इंदापूर डेपोमधून मुंबईला जाणारी ई-बस सेवा थांबली होती.सध्या, पुणे विभागातील १४ एमएसआरटी डेपोमधून राज्यातील विविध ठिकाणी बसेस धावतात. एमएसआरटी ने टप्प्याटप्प्याने ३०० हून अधिक जुन्या बसेस रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत ७२ शिवनेरी आणि शिवशाही बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.
 
पुणे विभागातील आगारांसाठी ४० राज्य परिवहन (एसटी) सुरू झाल्यामुळे, मुंबई मार्गावर धावणाऱ्या सेवा वातानुकूलित बसेसच्या नियोजनासह सुरू करण्यात आल्या असू, आंतरराज्य स्तरावर एसटी फेऱ्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. एसटी बसेसचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल, अशी माहिती पुण्यातील एमएसआरटीसी विभागीय अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली. 
 
४० बसेस पुढीलप्रमाणे धावतील :
 
बारामती आगार - सासवड, पुणे मार्ग (८) आणि बेळगाव (१)
 
इंदापूर आगार - तुळजापूर (४), उमरगा (४), परळी (२)
 
शिवाजीनगर आगार - भीमाशंकर (५), इंदूर (२), त्र्यंबकेश्वर (२) आणि बीड (१)
 
स्वारगेट आगार - बिदर (४), उदगीर (४) आणि गुलबर्गा (२)

Related Articles